"मतावर नाही तर मतदानावर निष्ठा ठेवून कामं", राजकीय हस्तक्षेपावर विश्वास पाटील यांचे सडेतोड भाष्य
सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते मतावर नाही तर मतदानावर निष्ठा ठेवून काम करत आहेत, या शब्दात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी सडेतोड भाष्य केले आहे. आपण प्रशासकीय सेवेत काम करत असताना मोठ्या मनाचे राजकीय नेते होते, त्यामुळे शासकीय आताच्या एवढा कामात हस्तक्षेप नव्हता, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर लॉकडाऊनच्या काळात दारुच्या दुकानांना परवानगी दिली गेली पण ग्रंथालयं बंद ठेवली गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांकडे वेळ होता पण वाचण्यासाठी पुस्तकं नव्हती, असे त्यांनी सांगितले. विश्वास पाटील यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी....