दिल्ली आंदोलन : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वर्ध्यामध्ये 'सत्याग्रह'

Update: 2021-01-04 08:36 GMT

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना उलटून गेला आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. महाराष्ट्रातूनही हजारो शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. वर्ध्यामध्येही गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन वर्ध्यामध्ये सत्याग्रह सुरू केला आहे,

वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा मानला जातो. याच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अनेक मोर्चे, आंदोलन आणि उपोषण झाले आणि त्यावर तात्काळ प्रशासनाने किंवा सरकार यांनी लक्ष दिले. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा मार्ग पुन्हा नव्याने वर्धा जिल्ह्यामध्ये विविध संघटनांनी एकजुटीने अवलंबला आहे. गेल्या बावीस दिवसांपासून इथे सत्याग्रह सुरू आहे. केंद्र सरकाराने तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावे अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते आहे.


Full View
Tags:    

Similar News