Sachin Pilot हे Congress मधून बाहेर पडणार का ?

कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली असतानाच राजस्थानमध्ये काँग्रेसचे नेते सचिन पायलट बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण खरंच सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडतील का? जाणून घेण्यासाठी वाचा....

Update: 2023-05-17 02:11 GMT

Rajasthan Congress News : कर्नाटकमधील लक्षवेधी विजयाच्या गुलालाचा रंग अजून उतरलाही नाही. तोच काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटविण्याचं आव्हान उभं ठाकलंय. एकीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शाब्दिक वादाला सुरूवात केली तर सचिन पायलट यांनी जनसंघर्ष यात्रा (Jansangharsh Yatra) सुरू केलीय. अशावेळी काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांचं मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यांना संयम ठेवण्याची सूचना करण्यात आलीय. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन (Mallikarjun Kharge) खरगे यांनीही पायलट यांच्याशी संपर्क केलाय आणि त्यांना संयम ठेवण्याची सूचना करत 'अच्छा होगा' असा संदेश दिलाय.

काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून पायलट यांना राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांचेही सूर आता काहीसे बदलले आहेत. रंधावा या वादावर म्हणाले, " माझे वडील आणि सचिन यांचे वडील चांगले मित्र होते. आमच्या कुटुंबियांत आजही चांगले संबंध आहेत. सचिन माझ्या छोट्या भावासारखे आहेत. मी त्यांना माझ्यासोबत नेण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. सचिन यांच्या अडचणींसंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेल, मात्र याआधी काय झालं, यावर चर्चाच होऊ शकत नसल्याचं रंधावा यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जनसंघर्ष यात्रेतून सचिन पायलट यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाला सुरूवात केलीय. अशा परिस्थितीत त्यांची समजूत काढण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. मात्र, त्याानंतरही पायलट यांची ही यात्रा सुरूच आहे. त्यामुळं सध्यातरी काँग्रेससाठी राजस्थानचा तिढा त्रासदायक ठरतांना दिसतोय. अशा परिस्थितीत सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडल्यास सरकारला धोका ठरू शकतो, त्यामुळं पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच आहे. अशावेळी पायलट यांनी अद्यापही भविष्यातील त्यांचे मनसुबे काय असतील, याचा थांगपत्ता कुणालाही लागू दिलेला नाही.

Full View

Tags:    

Similar News