महाराष्ट्रात पांच महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तसा राजकीय हालचालींना वेग आला , हा आठवडा कल्याण डोंबिवलीत मात्र खळबळ माजविणारा ठरला आहे. मनसे आणि भाजप दोघांनाही अस्वस्थ करणारी घटना घडली ती म्हणजे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मनसेच्या 12 पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय राजेश कदम यांनी का घेतला हे त्यांच्याकडूनच जाणून घेतले आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी.....