न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरे यांना नाही - ऍड.असीम सरोदे
राज ठाकरे जो विषय मांडत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे मत पर्यावरण कायदेतज्ञ व सविधान विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. मशिदीवरील भोंगे काढले नाही त्यापेक्षाही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणून हे म्हणणे मुळात चुकीचे आहे त्याला कायदेशीर पद्धतीने आपण बघितलं तर कोणत्याही भारतातील कुठल्याच न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा हा निर्णय कधीच दिलेला नाही तसेच राज ठाकरे यांना माझे आव्हान आहे की मशिदीवरील भोंगे काढा असा एकतरी निर्णय मला दाखवावा आणि न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरे यांना नाही असे देखील ऍड.असीम सरोदे यांनी म्हटले आहे.