राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागून आयोध्येला जावे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
राज ठाकरेंकडून अनेकदा उत्तर भारतीयांचा अपमान झाला आहे. राज ठाकरे यांनी भगवा रंग धारण केला आहे पण, त्यांनी आता शांततेच्या मार्गाने जावे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशला जाण्याचा अधिकार आहे, पण त्यांचा अपमान खूप झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी यांनाचा राज्याभिषेक करण्यास त्यावेळी महाराष्ट्रा मधील ब्राम्हणांनी विरोध केला, पण उत्तर प्रदेश मधून इकडे येऊन गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता.
राज ठाकरे हे उत्तर भारतीयांना विरोध करतात ते चुकीचं आहे. उत्तर प्रदेशला विरोध करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचे सारख आहे.राज ठाकरे हा वादग्रस्त नेता आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा नाही असंही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले.