शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या ईडी चौकशीवरुन विविध राजकीय प्रतिक्रीया येत असून राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका घेतली नव्हती, मात्र प्रताप सरनाईक यातून निर्दोष बाहेर पडतील असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांना ही इडीची नोटीस आली होती, आणि प्रताप सरनाईक हे धिरोधत्तपणे ईडीच्या चौकशीला समोर जातील. चौकशी होत असते याचा अर्थ गुन्हा झाला असं नाही, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी मनसेच्या वाढीव वीज बिलाविरूद्धच्या मोर्चा दरम्यान व्यक्त केली आहे.
दरम्यान मराठी माणसाबद्दल संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये कारण राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका घेतली नव्हती, मात्र प्रताप सरनाईक यातून निर्दोष बाहेर पडतील असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला आहे. त्याच बरॊबर येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणूका मनसे स्वबळावर लढवणार आहे, मात्र राज ठाकरेंनी भाजपशी युती केली तर सैनिक म्हणून काम करणारं असं ही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.