कोकण पूर नियंत्रण परिषदेच्या विचारमंथनात 'पूर, परिस्थिती आणि मानसिक पुनर्वसन' या सत्रात मु्ख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कोकणात पूर, नैसर्गिक आपत्ती आल्या, मात्र, कोकणी माणसाने कधीच हार मानली नाही. मोठ्या हिंमतीने प्रत्येक संकटाचा सामना केला. मोठमोठी संकटे आली, कोकणी माणसाने कधीच आत्महत्या केली नाही. यातूनच कोकणी माणसाचे धाडस कळते असे चिवटे यावेळी म्हणाले.