विक्रम गोखले : सिनेमात सारखे दलितांवरील अत्याचार दाखवले तर लोक कंटाळतात
"जातपात मराठी सिनेमामध्येही आणली तर तुमचा सिनेमा जातीपातीच्या पलीकडे जाणार नाही, सारखे दलितांवर कसे अत्याचार होत आहेत एवढेच तुम्ही दाखवत बसलात तर लोकांना कंटाळा येतो कारण तसे आता होत नाही" असे वक्तव्य केले आहे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी....
मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये विक्रम गोखले यांनी कंगना रानावतचे स्वातंत्र्याबाबतचे वक्तव्य, त्यावर त्यांनी घेतलेली भूमिका आणि मराठी सिनेमातील जातपात या विषयांवर परखड भाष्य केले.