या साऱ्यांचा संसारच भिजून गेलाय, जगायचं तरी कसं?
नाशिक जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. त्यात लोकांचं सर्वकाही पाण्यात गेलं आहे. त्यामुळे आम्ही जगायचं तरी कसं? असा सवाल नागरिक विचारत आहेत.;
गेल्या महिनाभरात अवकाळी पावसाचे आणि त्यामुळे नुकसान झालेल्या लोकांचे अनेक चेहरे आपण पाहतोय. प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती वेगळी असली तरी कारण एकच आहे, अवकाळी पाऊस. एकीकडे महाराष्ट्रत या पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलंय तर दुसरीकडे ही परिस्तिथी आहे. कुणाच्या घरात लहान-लहान लेकरं आहेत तर कुणाच्या घरात वयोवृद्ध आई वडील. आता या सगळ्या परिस्थितीला अनेकजण प्रशासनाला दोष देतील तर अनेकजण निसर्गाला. सगळेजण आता एकमेकाला दोष देतील पण या सगळ्यांचे संसार उघड्यावर पडलेत एवढं मात्र नक्की..