सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या केसबद्दल एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. ज्यानुसार त्यांचा सगळा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे सुपूर्द करावा असा निर्णय देण्यात आला. या निकालादरम्यान परमबीर सिंग यांच्या वकीलांनी वापरलेली भाषा ऐकून मला प्रचंड धक्का बसला. त्यांनी सांगितले की, परमबीर सिंग यांचे म्हणणे आहे की, मी दोषी असेन तर मला फाशी द्या पण राज्य सरकारच्या दयेवर मला सोडू नका. मुंबईचा पोलिस आयुक्त राहिलेला माणूस अशाप्रकारचं वक्तव्य करू शकतो यावर माझा विश्वास बसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही, असे राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी म्हटले आहे.