Raver Loksabha साठी Eknath Khadse नाही तर Rohini Khadse मला लीड देतील...| Shreeram Patil
रावेर लोकसभेसाठी एकनाथ खडसे नाही तर रोहिणी खडसेच मला लीड देतील असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्र ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे. रावेर लोकसभा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाला सोडचिट्टी देत एकनाथ खडसे सून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय झाले आहेत. तर कन्या रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादीचा प्रचार करत असून मोदी सरकार वर जोरदार हल्ला चढवत आहे. उमेदवारी साठी महिन्याभरात तीन पक्ष बदलणारे उद्योजक श्रीराम पाटील असा आरोप भाजप कडून होत असतांना रक्षा खडसेंचा प्रचंड जनसंपर्क असतांना 2019 मध्येच आपण रक्षा खडसे यांच्याविरुद्ध उमेदवार राहिलो असतो असा गौप्यस्पोट पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत केलाय. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी....