आदिवासी बांधवांचा विकास करायचा असेल आणि त्यांच्यापर्यंत मुलभूत सुविधा पोहोचवायच्या असतील तर मंत्र्यांना कायदा तोडावा लागतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. रस्त्यांच्या विकासात वनविभागाच्या नियमांचा अडसर कसा येतो याचे उदाहरण देताना नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील रस्त्यांच्या कामाबाबतचा प्रसंग सांगितला. आरोग्य विज्ञान केंद्राच्या संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.