ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्यासाठी खादी विभागातर्फे चांगल्या दर्जाच्या आणि आकर्षक वस्तू बनवल्या जात आहेत. पण भारतात जोपर्यंत सेलिब्रिटी त्याची जाहिरात करत नाहीत तोपर्यंत लोक त्या वस्तू वापरत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांली लगावला आहे. वर्धा मंथन २०२१ या कार्यक्रमात ग्राम स्वराज की आधारशीला या परिसंवादात ते बोलत होते.