आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar ) यांच्यावर एन्रॉन, भूखंड घोटाळा, तेलगी घोटाळा (telgi scam ) या सारख्या अनेक प्रकरणात आरोप झाले. मात्र, या सर्व प्रकरणांतून तेल लावलेल्या पैलवानासारखे बिनदिक्कतपणे शरद पवार निसटले. शरद पवार यांच्यावर शिखर बॅंक घोटाळ्या (Shikhar Bank Scam)प्रकरणी ईडीने (ED) गुन्हा दाखल केला होता. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा गुन्हा दाखल झाल्याने भाजपवर विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला जात होता. या संदर्भात शरद पवारांना भाजपकडून अडकवलं जात आहे का? काय आहे संपुर्ण प्रकरण? पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे विश्लेषण पाहा मॅक्स महाराष्ट्रवर...