इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या विषाणूची संसर्ग क्षमता कोरोनाच्या आधीच्या विषाणूपेक्षा जास्त आहे. पण असे असले तरी त्याचा धोका मात्र आधीच्या विषाणू एवढाच आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे पुरेपूर नियम पाळावे असे आवाहन इंग्लंडमधील डॉक्टर संग्राम पाटील यांनी केले आहे. नवीन विषाणूची लागण झाल्यास उपचार त्याच पद्धतीने होणार आबहेत, तसंच नवीन विषाणूचा परिणाम लसीच्या कामावर होणार नाही तसेच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्याचा जास्त धोका नाही, पण त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.