एका दहशतवाद्याच्या फाशीची ही कहाणी

अतिशय गुप्तता राखुन देण्यात आलेल्या देशातील आजवरच्या टॉप सिक्रेट फाशी ला ११ वर्ष पूर्ण होत आहे. या टॉप सिक्रेट फाशीपूर्वी देशात आठ वर्ष कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्यात आली नव्हती. एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याला होणाऱ्या फाशीची तारीख वेळ हे बहुतांश लोकांना माहीत करण्यात येते. परंतु अत्यंत गुप्तता राखून कैद्याला फाशी देण्याची ही देशातील पहिलीच वेळ असेल . फाशीच ठिकाण होत पुण्यातील येरवडा जेल.;

Update: 2023-11-21 02:59 GMT

1995 नंतर तब्बल सोळा वर्षांनी पुण्यातील येरवडा जेलमध्ये 21 नोव्हेंबर 2012 रोजी ही टॉप सिक्रेट फाशी होणार होती. पण या फाशीची थोडी सुद्धा भनक इतर कोणालाही नव्हती. अगदी पुण्याच्या येरवडा जेल च्या मुख्य जेलरला देखील.

ही टॉप सिक्रेट फाशी कोणाला देण्यात आली ?

फाशीपूर्वी काय काय घडलं?

फाशीची गुप्तता कशी ठेवण्यात आली?

कैद्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यामध्ये किती जणांची टीम होती?

या सर्वाचा आढावा आज आपण घेणार आहोत.

तारीख 26 नोव्हेंबर 2008 याच दिवशी काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या महाराष्ट्रातील मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा आणि पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा देखील बळी घेतला. हे दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादांपैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश प्राप्त झालं.

त्याच नराधम दहशतवाद्याच्या फाशीची ही कहाणी.

मोहम्मद अजमल कसाब ह्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय विशेष न्यायालयाकडून 6 मे 2010 रोजी फाशीची सजा ठोठावण्यात आली. 26/11 2006 ला मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला केल्याचा गुन्हा मान्य करून देखील कसाबने विशेष न्यायालयाकडून देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पुढे हायकोर्टात आणि मग सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने विशेष न्यायालयाकडून देण्यात आलेली फाशीची शिक्षा ही कायम ठेवली.

फाशीच्या या शिक्षे विरोधात कसाबने नोव्हेंबर 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयायाचिका केली. पण राष्ट्रपतींनी देखील 5 नोव्हेंबर 2012 ला त्याचीही दया याचिका फेटाळून लावली. 7 नोव्हेंबर 2012 ला फेटाळलेली कसाबची दया याचिका तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे येते आणि तिथून लगेचच दुसऱ्या दिवशी आठ नोव्हेंबर 2012 ला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला संबंधित विषयातील पत्र पाठवलं जातं आणि महाराष्ट्र सरकारला कसाबची फाशीविरोधातील दया याचिका फेटाळल्याच कळवलं जातं. यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आर.आर.पाटील, मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण

केंद्राकडून राज्याला यासंदर्भातली सूचना प्राप्त झाल्यानंतर सुरू होते कसाबला देण्यात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची तयारी. आणि सर्वात महत्त्वाचं फाशीच्या गुप्ततेच प्लानिंग...

तारीख 10 नोव्हेंबर 2012 याच दिवशी महाराष्ट्र सरकारची एक विशेष बैठक होते. बैठकीचं कारण दहशतवादी कसाबची फाशी. या बैठकीदरम्यान फाशीसाठी दोन तारखांची निवड केली जाते (1) 20 नोव्हेंबर 2012 आणि दुसरी म्हणजे 21 नोव्हेंबर 2012. या बैठकीला देखील तत्कालीन सरकारमधील काही मुख्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित असतात.

ऑर्थोड रोड जेल, मुंबई येथे कसाबला १२ नोव्हेंबर 2012 ला पहिल्यांदा त्याला फाशीची शिक्षा ही कायम ठेवण्यात आली आहे. असं सांगितलं जातं आणि फाशीची तारीख देखील कळवली जाते. व भारतीय कायद्यानुसार त्याला त्याची शेवटची इच्छा देखील विचारले जाते.

"मुझे मेरी अम्मी के साथ बात करनी है" ही शेवटची कसाब ची इच्छा. मात्र सुरक्षेच्या आणि गुप्ततेच्या कारणास्तव कसाबची ही इच्छा त्याचवेळी पूर्ण करणे सरकारला शक्य नव्हतं. म्हणूनच फाशीच्या काही तास आधी तुझी इच्छा पूर्ण केली जाईल असं कसाबला कळवण्यात येत.

कसाब कडून विविध पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांची ठिकाणे त्याचबरोबर भारतावर झालेल्या आज वरील दहशतवादी हल्ले. पुढे होणाऱ्या काही दहशतवादी हल्ल्यांसंबंधी माहिती. आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची सिद्धता होऊन त्याला फाशीची शिक्षा सुनवण्यापर्यंत कसाबवर सरकारकडून कित्येक कोटींचा खर्च करण्यात आला होता. यामध्ये कसाबच्या सुरक्षेपासून त्याच्या न्यायालयीन प्रक्रिया वकील आणि त्याच्या खाण्या राहण्याच्या देखील बाबींमुळे करण्यात आलेल्या कोट्यावधी चा खर्च विरोधात आधीच सरकार वर विरोधकांकडून आणि नागरिकांकडून टिकेची झोड उठवली जात होती. कसाबची बिर्याणी ही चर्चेचा विषय बनली होती.

वारंवार होणाऱ्या टिके मुळे आणि कोणत्याही प्रकारे फाशी मध्ये दिरंगाई होऊ नये म्हणून आणि कसाबला होणाऱ्या फाशीमध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये याच करिता तत्कालीन सरकारने गुप्तता पूर्ण फाशी देण्याचे नियोजित केले. सर्व संबंधित अधिकारी, मंत्री आणि लोकांना गुप्ततेची शपथ देण्यात आली आणि सुरू झालं कसाबच्या फाशीचं ऑपरेशन..

Full View

१७ नोव्हेंबर.. सातत्याने पाकिस्तानच्या हिटलिस्टवर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण देशाचं लक्ष बाळासाहेबांच्या अंत्ययात्रा आणि जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची चर्चा करण्याकडे गुंतलेलं असताना मुंबईचं पोलीस दल मात्र ऑपरेशन एक्स या वेगळ्याच ऑपरेशन मध्ये बिझी होतं. १८-१९ नोव्हेंबर च्या रात्री कसाब ला अतिशय गुप्तपणे पुण्यात हलवलं. या ऑपरेशनची कुणालाही कानोकान खबर नव्हती.

ज्यावेळेस कसाबला मुंबईतील ऑर्थोड जेल मधून हलवण्यात आलं त्यावेळेस तेथील काही अधिकारी वगळता जेल प्रशासनाला देखील याची माहिती नव्हती. किंबहुना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये २० नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास ज्यावेळेस कसाबला नेण्यात आलं. त्याच वेळेस पुणे येरवडा कारागृहाच्या मुख्य जेलरला देखील याची माहिती नव्हती. कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेल्यानंतर येरवडा जेलच्या मुख्य जेलर आणि काहीच पोलीस कर्मचाऱ्यांनाच याची माहिती देण्यात आली. आणि जोपर्यंत कसाबची फाशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क घरच्यांना किंवा इतरांनाही करू नये अशा सूचना देण्यात आल्या. आणि त्यांचे फोन्स देखील जमा करून घेण्यात आले अशी माहिती समोर येते.

21 नोव्हेंबर 2012.... अखेर ही तारीख उजाडताच सकाळी साधारण सहा ते साडेसातच्या दरम्यान कसाबला फाशी देण्यात आली. तेथे उपस्थित काही डॉक्टरांच्या टीम कडून कसाबच्या मृत्यूची पडताळणी करण्यात आली आणि त्याचे मृत्युपत्र देखील तयार करण्यात आले.

कसाबला फाशी देण्यात आल्याची माहिती पाकिस्तान सरकारपर्यंत भारताकडून पोहोचवण्यात आली आणि कसाबच्या घरच्यांना देखील त्याचे शव हवे असल्यास ते दिले जाईल याची देखील माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आली. परंतु पाकिस्तान कडून कोणतेही उत्तर न आल्याने भारतीय कायद्यानुसार कैद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या धार्मिक परंपरेनुसार त्याच्या शवाची अंतिम क्रिया करण्याचे ठरवण्यात आले. इस्लामिक पद्धतीने कसाबची दफन प्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु इतर कोणत्याही ठिकाणी त्याचे दफन केल्यास मृताच्या मृतदेहाची विटंबना ही होऊ शकते याचमुळे येरवडा कारागृहातीलच एका अज्ञात स्थळी इस्लामिक रीतीरीवाजाप्रमाणे मौलवी बुलवून कसाबचा दफन विधी करण्यात आला. याची देखील माहिती काही ठराविक लोक वगळता इतरांना नाही.



भारतात पहिल्यांदाच झालेली ही सिक्रेट फाशी अनेक काळापर्यंत चर्चेचा विषय बनली.

Tags:    

Similar News