औरंगजेबाच्या भावाची कबर मोदी सरकार का शोधत आहे?
मोदी सरकारने इतिहासातील एका नावाजलेल्या मुघल युवराजाची कबर शोधण्याचे काम सुरू केले आहे. ही व्यक्ती कोण आहे आणि मोदी सरकार त्यांची कबर का शोधत आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ इतिहासकार आणि विचारवंत राम पुनियानी यांनी...
मुघल बादशाह शहाजहाँचा सर्वांत मोठा मुलगा आणि औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोहची कबर मोदी सरकार शोधणार आहे. यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन कऱण्यात आली आहे. मुघलकालीन इतिहासात रक्तरंजित परंपरा शहाजहाँ बादशहानंतरही सुरू राहिली. सिंहासन काबीज करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या मोठ्या भावाचा म्हणजेच दारा शुकोहचे मुंडकं छाटून हत्या केली.
विचारवंत, धर्मपंडीत, सूफी पंथाबाबत व ललित कलांबाबत ज्ञान असलेला अशी दारा शुकोहची ओळख होती. गीता या धर्मग्रंथाचा फारसी भाषेत शुकोहने अनुवाद केला होता. दारा शिकोह नक्की कसा होता? तो जर जिवंत असता तर इतिहास बदलला असता का? त्याची कबर शोधण्यामागची मोदी सरकारची नेमका हेतू काय आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासकार राम पुनियानी यांनी....