मुंबईत IPL ची बस मनसेनं फोडली...

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-03-16 14:39 GMT
मुंबईत IPL ची बस मनसेनं फोडली...
  • whatsapp icon

आय पी एल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे.महाराष्ट्रात होणारे आयपीएल च्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता आय पी एल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून ही काहीही होत नव्हते त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.


Full View

Tags:    

Similar News