कामगारांचे शोषण करणारे कायदे आले मात्र यावेळी कामगारच गायब झाले. कामगारांचे कुठेच आंदोलन झाले नाही. इतकं सगळं होतं असताना फक्त कामगारच नाही तर कामगारांचे नेते सुद्धा गायब झाले. सद्यस्थिती पाहिली तर देशाचे चार स्तंभ हे डोळे बंद करून बसले आहेत. कुठेही या विरोधात आवाज उठवला जात नाही, तुमचा आवाज बंद केला जातो. अशा परिस्थितीत कामगारांच्या एकत्रित एल्गारची गरज असल्याचं मत मॅक्स महाराष्ट्र आयोजित ‘कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन’ या कार्यक्रमात संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले.