एकीकडे एकामागून एक हिंदी सिनेमा फ्लॉप होत असताना जागतिक पातळीवर मात्र एका मराठी सिनेमाने आपली छाप उमटवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पल्याड' सिनेमाची अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दखल घेतली गेली आहे.
एवढेच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानेही शैलेश दुपारे यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. समाजाने दुर्लक्षित केलेल्या आणि वाळीत टाकलेल्या मसनजोगी समाजावर आधारित पल्याड सिनेमाची कथा, सिनेमा निर्मितीचा प्रवास आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला सन्मान याबाबत दिग्दर्शक शैलेश दुपारे यांच्याशी बातचीत केली आहे किरण सोनवणे यांनी....