आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. त्यामुळं आता मराठा समाजासमोर पुढं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने घटनातज्ज्ञ Adv. असिम सरोदे यांच्याशी बातचीत केली. यावेळी असिम सरोदे यांनी राज्य सरकारने आत्तापर्यंत आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका, गायकवाड समितीच्या अहवालातील तृटी नक्की कोणत्या आहेत. तसंच आता राज्य सरकारने काय भूमिका घ्यावी? यावर मार्गदर्शन केलं आहे.