Coronavirus च्या या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद घटनात्मक पेचामध्ये डावावर लागलं आहे. कोणत्याही नेत्याने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचं सदस्य होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरस चा देशात प्रकोप सुरु असल्यानं राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळं महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे सरकारची निवड करण्यात यावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत पार केला आहे.
त्यामुळं राज्यपाल कोणती भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं आहे.
त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेतात? तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे..या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विशेष विश्लेषण नक्की
पाहा....