एकनाथ शिंदे यांच्या गटाने पुकारलेल्या बंडामुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करत अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांमार्फत नोटीस पाठवली आहे. मात्र हे आमदार अपात्र ठरणार का? आमदार अपात्र कधी ठरू शकतो? दोन तृतियांश सदस्यांचा नियम लागू होईल का? नरहरी झिरवळ यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाचं काय? याबरोबरच राज्यपाल अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकतात का? याबाबत शिवसेनेचे वकील adv. देवदत्त कामत यांनी भूमिका मांडली आहे.