आकडे आहेत तर एकनाथ शिंदे गुवाहटीत काय करत आहेत? शरद पवार यांचा सवाल

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तर शिंदे गटाने आपल्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले.;

Update: 2022-06-27 02:09 GMT

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र यानंतर शिंदे गटाने मुंबईत येऊन आपलं मत मांडावं असं मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांचा गट एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान शिंदे समर्थक 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला सवाल केला आहे. शरद पवार रविवारी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ असेल तर मग ते मुंबई सोडून गुवाहटीत काय करत आहेत? त्यांनी विधानसभेत आपलं बहुमत सिध्द करून दाखवावं, असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News