आत्महत्यामुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्र्याच्या घोषणेचे काय झालं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र या घोषणेचं काय झालं? पहा अमर हबीब यांचे विश्लेषण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी दिनाच्या निमीत्ताने केलेल्या भाषणात महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा निर्धार केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर 23 दिवसात महाराष्ट्रात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर फक्त मराठवाड्यात 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचे काय झाले? या विषयावर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांनी शेती प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांच्याशी संवाद साधला आहे.