गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर आलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच मध्य प्रदेशने ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी काय काय केले याचीही माहिती त्यांनी दिली आहे.