विचारवंत, साहित्यरत्न, लोकशाहीर अशा अनेक उपाध्यांनी ओळखल्या जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती... समाजातल्या रसातळ्यातील लोकांकडे मानवकल्याणाच्या नजरेतून पाहत असताना त्यांच्यासाठी झुंजार होऊन लढा, संघर्ष अण्णाभाऊ यांनी पुकारला होता. शोषित,वंचित, कष्टकरी, कामगार आणि दलितांचा आवाज म्हणून त्यांनी कार्य केले. जैविक विचारांचं व्यक्तिमत्व असलेल्या अण्णाभाऊंना लोकल टू ग्लोबल प्रश्नांची जाणीव होती. या जाणीवेतून त्यांनी नवीन समाज घडवण्यासाठी अनेक शाहीरी, जलसे, पोवाडे, कांदबरी लिहिल्या. दीड दिवस शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे परिवर्तनवादी विचार समाजाला आजही नवी दृष्टी देणारे आहे. अष्टपैलू अशा व्यक्तिमत्वाकडून आजच्या पिढीनं नेमकं काय घ्यावं? त्यांच्या विचारांची पेरणी कशी करावी? यासंदर्भात लोकशाहीर संभाजी भगत यांनी केलेले विश्लेषण आणि अनुभव नक्की पाहा...