कोकणातील महाड आणि चिपळून भागांमध्ये अतिवृष्टीमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशातच मुंबईतील चेंबूर परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे 'एक हात मदतीचा' या उपक्रमातंर्गत पूरग्रस्तवासीयांसाठी मदत करण्यात येत आहे.
या पूरग्रस्त नागरिकांसाठी 500 च्या जवळपास अत्यावश्यक वस्तूंचे कीट आणि जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर महिलांसाठी विशेष मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. चेंबूर परिसरातील मनसे तर्फे केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात आम्ही चेंबूर वासियांशी बातचीत केली.