संकट कोणतंही असो राजकारणी त्यात आपल्या संधी शोेधत असतात. असाच प्रकार कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या बाबतीतही घडला आहे. औरंगाबादमध्ये लॉकडाऊनला MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला. त्यानंतर लॉकडाऊन मागे घेण्यात आले, पण हा आपला विजय असल्याच्या आविर्भावात जलील यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. यावेळी त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने लोकप्रतिनिधींनी सामान्यांचा कायदा लागू होत नाही का, असा सवाल उपस्थित झाला आहे.