भारत जोडो यात्रेला आतापर्यंत अफाट प्रतिसाद मिळाला आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ३ हजार ५०० कोलोमीटरचा टप्पा १५० दिवसात पूर्ण करणार आहे. आता राहुल गांधी यांना जो प्रतिसाद मिळत आहे तोच कायम राखण्यासाठी काँग्रेस समोर मोठं आव्हान असणार आहे. आज पासून प्रियंका गांधी सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. मध्य प्रदेशात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा यशस्वी करणं काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. याचं कारणासाठी प्रियंका गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत का..? येत्या काळात मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत तर याची ही पूर्वतयारी सुरु आहे का..?