सध्याच्या डिजीटल काळात सर्वकाही डिजिटल झालंय त्यामुळे वेगवेगळ्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळे ॲप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हेच ॲप तुमच्या भावनांशी खेळून पैसे कमवत आहेत. इंटरनेटवर तुम्ही खरं प्रेम शोधण्याच्या नादात सायबर फसवणूकीला बळी पडताय. सायबर प्रेम तुम्हाला मानसिक सोबत शारिरीकरित्या आजारी करत आहे. येत्या काळात नात्यांचे व्यापारीकरण आणि नात्यांचे भांडवशाही तत्वज्ञान उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटच्या या आभासी जगात तुम्ही वास्तवाला मुकताय का? सायबर फेरफटका आपल्याला उन्मादी बनवतोय का? इंटरनेटच्या जगात खरं प्रेम शोधताय तर 16 मिनिट थांबा आणि मानवसोपचार तज्ञ डाॅ. प्रदीप पाटील हा व्हिडिओ पाहा आणि पावलं उचला...