जातीभेद नष्ट करायचा असेल तर जास्तीत जास्त आंतरजातीय झाले पाहिजेत असे अनेक महापुरूषांनी सांगितले आहे. असाच आदर्श घडवणारा एक विवाह ठाण्यात झाला आहे. महाराष्ट्रातील पहिला मराठा - वैदू आंतरजातीय विवाह ठाण्यात पार पडला आहे. जातपंचायत आणि जाती व्यवस्थेला नकार देत वैदु समाजातील मुलाने आणि मराठा समाजातील मुलीने कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला. विशेष बाब म्हणजे या दोघांच्याही घरच्यांनी आनंदाने परवानगी दिली आहे. या सगळ्यांशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...