देशात सध्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. दरम्यान या काळात राजकिय नेते मंडळी अथवा प्रशासन जी भूमिका घेतेय त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये मात्र संतापाच वातावरण आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील महादेव पिंपळगाव येथे अशोक चव्हाण यांची सभा घेण्यासाठी थेट गावातील गावकऱ्यांनाच पोलिसांनी स्थानबद्ध करुन पोलिसात अडकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान मराठा आंदोलक असणाऱ्या महादेव पिंपळगाव येथील नागरिकांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करू असे पोलीस प्रशासनाने नोटीस देऊन सांगितलेय. ज्यात त्यांना प्रतिबंधात्मक कलम149नुसार नोटीस देउन पोलिसात येऊन बसाव लागलंय. त्यामुळं नांदेड लोकसभा निवडणुक लोकशाही प्रमाणे नसून हुकूमशाही कडे जात असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलीय...