समृद्धी महामार्ग समृद्धीचा महाद्वार आहे, हे सर्वांना कळतंय, याचा मला आनंद! : फडणवीसांचा ठाकरेंना टोला
कधीकाळी सत्तेत असताना विरोध करणारे उध्दव ठाकरे आता समृध्दी महामार्गासाठी विरोध करत होते. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतःहून समृध्दीवर जाऊन त्यांना व्हिजन लक्षात आली.
महाराष्ट्राचा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मुंबईला जोडून महाराष्ट्र एकात्म होत आहे. समृध्दी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलेल. शिवसेनेचा सुरवातीला विरोध होता परंतू आम्ही एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून त्यांना समजावून सांगितले. आता ते स्वतः लक्ष घालून महामार्ग १ मे पासून सुरु करताहेत याचा आम्हाला आनंद आहे, असे फडणवीसांनी सांगितले.