मंत्रालयातील काम आटोपल्यानंतर ते बाहेर निघाले असता काही पोलिस कर्मचारी व अधिकारी घाईने वरच्या मजल्याकडे जात असल्याचे त्यांनी पाहिले. काहीतरी घडले असल्याचे त्यांनी ताडले व अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार समजला. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील गच्चीवर दोन तरूण आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. आ. लंके पोलिसांच्या पुढे जात ते गच्चीवर पोहचले. तेथे जाताच दोन पावले जरी पुढे आले तर आम्ही खाली उडया टाकू अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर या तरुणांना समजावून खाली उतरवण्यात आले.. तरुणांचा जीव वाचला अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या वाचल्या. अधिवेशन सुरू असताना एक मोठा अनर्थ कसा टाळला याविषयी बातचीत केली आहे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी..