कोरोना महामारी येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला गेली होती. त्यात कोरोना महामारीने भर घातली आणि संपूर्ण देश लॉकडाऊनच्या मार्गावर गेला. गेल्यावर्षी लागलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे भारतात 12 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा रिपोर्ट CMIE ने दिला. या 12 कोटी कामगारांमध्ये 9 कोटी असंघटीत कामगारांचा समावेश आहे. नोकरी गेल्यानं कामगारांच्या मानसिक आरोग्यासोबतच कौटुंबिक मानसिक स्वास्थ बिघडलं.
कामगारांच्या हातात रोजगार नसल्यामुळे आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं असून सद्यस्थिती म्हणजेच दुसऱ्या लॉकडाऊनंतरही नोकऱ्या मिळणं अवघड झालेलं आहे. एकंदरित भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना कर्मचारी, कामगार, महिला, तरुणाई यांच्या मानसिकतेवर ऩेमके काय परिणाम झाले? या परिणामांचे पडसाद समाजात कसे उमटले? बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढली आहे का? तसेच यावर सरकार काय विचार करते? एक ना अनेक अशा समाजाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित असलेल्या प्रश्नांची उत्तर मॅक्स महाराष्ट्रचा 'माझं मानसिक स्वास्थ' या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी दिली आहेत. सोबतचं यावर उपाय देखील त्यांनी सांगितले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडलेल्या तुमच्या मनातील प्रश्न खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकतात. vrushali31@gmail.कॉम दररोज सकाळी ११ वाजता 'माझं मानसिक स्वास्थ' हा विशेष कार्यक्रम पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर