जागतिक युवा दिनानिमित्त आजच्या युवा पिढीला करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न पडलेले असतात. किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे? हे जरी ठरवलं असलं तरी त्याचं प्लानिंग त्यासंदर्भातलं मार्गदर्शन नेमकं कसं असावं? हा प्रश्न समोर असतो.
युवा पिढीला नोकरी करण्यात बऱ्याचदा रस नसतो. त्यांना स्वतःचा बिझनेस सुरु करायचा असतो. त्यात त्यांना कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये (रिअल इस्टेट मध्ये) बिझनेस करायचा असल्यास नेमकं काय करावं कळत नाही?
यासंदर्भात जागतिक युवा दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्रने युवा पिढीसाठी उद्योजक कसं व्हावं? आपल्या कौशल्यावर बिझनेस कसा उभारावा? बिझनेस सुरू करताना सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा? महिलांनी Construction लाईनमधलं स्वतःचं करिअर कसं सेट कराव? या संदर्भात हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स ग्रुपच्या सर्वेसर्वा उज्ज्वला हावरे यांनी मॅक्समहाराष्ट्रच्या माध्यमातून युवा पिढीला केलेलं मार्गदर्शन नक्की पाहा हा व्हिड़िओ...