गृहमंत्रीजी पोलिस भरतीची तारीख कधी जाहीर करणार?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात पोलिस भरतीची घोषणा केली खरी. मात्र, ही फक्त घोषणाच राहणार की प्रत्यक्षात भरतीची वेळ येणार? काय आहे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा...;

Update: 2020-11-03 06:37 GMT

सरकारी नोकरी मिळवणं सध्या खूप कष्ठाचं झालं आहे. मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, कारण लाखो मुलं सध्या स्पर्धेत आहेत. या लाखो मुलांमध्ये आपला टिकावं लागावा. यासाठी त्यांना अपार कष्ठ करावे लागतात. बौद्धिक, शारिरीक कष्ठ करत असताना मुलांना मोठ्य़ा रकमेची देखील गरज असते.

अशातच सरकार परिक्षेची घोषणा करते. तेव्हा विद्यार्थी जोमानं कामाला लागतात. रात्रीचा दिवस करतात. मात्र, परीक्षांची फक्त घोषणा होते. परीक्षाची तारीख येत नाही. आता गेल्या कित्येक दिवसांपासून थांबलेल्या पोलीस भरतीला महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिली खरी... मात्र, प्रत्यक्षात भरतीची तारीख कधी जाहीर होणार? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करतात.

मंत्रिमंडळाने 12 हजार 528 पदांना मंजुरी दिली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मात्र, पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारला लवकरात लवकर परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांशी बातचित केली आहे. आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी


Full View
Tags:    

Similar News