दिव्यांगानीच घेतला स्वच्छतेचा वसा....

Update: 2022-09-18 10:33 GMT

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृह मधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.




 


गेल्या अनेक दिवसापासून संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खेळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांना मच्छर साप इत्यादींचा सामना करावा लागत होता, अखेर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण मैदानाची स्वच्छता केली आहे.




 


या परिसरात एकूण तीन वस्तीगृह असून हजारो विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्यात अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. आम्हाला स्वच्छता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता अखेर आज स्वतः स्वच्छता केल्यानंतर आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी स्तरातून व्यक्त केली जात आहे. या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Tags:    

Similar News