जीएसटीचा गणपतीच्या मूर्ती विक्रेत्यांचा फटका

Update: 2022-08-30 15:29 GMT

महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव साजरा होत आहे. या उत्सवावर सध्या महागाईचे सावट घोंगावत असून त्यात जीएसटी लागू केल्याने गणेश मूर्तींच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील मूर्ती विक्रेत्यांवर परिणाम झाला असून भाविक भक्त मुर्त्या विकत घेण्यासाठी कमी प्रमाणात येवू लागले आहेत. पूर्वी दीड फुटाची गणेश मूर्ती घेणारे भाविक भक्त आता एक फुटाची मूर्ती विकत घेवू लागले आहेत.


Full View

Tags:    

Similar News