मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलून संभाजी नगर आणि धाराशिव केली. केंद्र सरकारकडे परवानगीसाठी अंतिम प्रस्ताव राज्य शासनाने पाठवला आहे. पण या आधीच गुगलने देखील नकाशावर संभाजी नगर आणि धाराशिव असं नामांतरण केलं आहे.