कोकणातील सर्वात लाडका सण असलेल्या गणेशोत्सवासाठी तळकोकणात जाण्यासाठी कोकणवासीय, चाकरमान्यांची मुंबई गोवा महामार्गावर मोठी वर्दळ दिसून येते. दोन वर्षे कोव्हिडं नंतर गणेशभक्त व कोकण वासीयांना उत्साही व आनंदी वातावरणात सण साजरा करण्याची मुभा मिळालीय. त्यामुळे शनिवार व रविवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांसह, बसेस यांची वर्दळ वाढली आहे. महामार्गावरील वाकन, कोलाड, इंदापूर, माणगाव येथे वाहनांची मोठी रीघ लागली असून वाहतूक कोंडी झाल्याची परिस्थिती पहावयास मिळतेय. महामार्गाची दुरावस्था, मोठमोठे खड्डे , उन्हाच्या झळा व वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशी त्रस्त झाल्याचे चित्र आहे.