जगात लबाड कोल्ह्याप्रमाणे रंग बदलणारे नेते आणि पत्रकार आहेत. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केली. काल्पनिक कथेतील रंगात बुडालेल्या कोल्ह्याप्रमाणे समाजात अनेक रंग बदलणारे नेते आणि पत्रकार आहेत. त्यामुळेच समाजाची दिशाभूल होते, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केली. ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलत होते.
'वुई आर ऑन ट्रायल-कसोटी विवेकाची' हे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचार दाखवणारे चित्र प्रदर्शन भरवले होते. यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, सलमान तहसीरसाहेब, सबीना मेहमूद यांच्याबरोबरच गौरी लंकेश यांनी खरं बोलण्याचा गुन्हा केला. त्यामुळे त्यांचा खून झाला. कारण लोक जीवापेक्षा आस्थेला मोठं मानतात. मात्र मी लहान असताना एक मौलवी पृथ्वी सपाट असल्याची भ्रामक गोष्ट सांगायचा. अंधश्रध्देच्या गोष्टी आमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करायचा, असंही शाह म्हणाले.
तसेच पुढे बोलताना एका कथेचा संदर्भ देत जंगलात ज्याप्रमाणे लबाड कोल्हा ज्याप्रमाणे जंगलाची दिशाभूल करतो. त्याप्रमाणे सध्या समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असलेले पत्रकार आणि नेते अंधश्रध्दा पसरवत आहेत. त्यामुळे खरे रंग बदलणारे कोल्हे हे पत्रकार आणि नेते आहेत.