राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यापार्श्वभुमीवर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ईडीला घाबरत नसल्याचे सांगितले. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेबद्दल, शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू असल्याबाबत सरकारची भुमिका काय आहे? प्राजक्त तनपुरे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल काय वाटतं? याबरोबरच वीज कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न करणार? आणि कर्मचाऱ्यांना कोणते आश्वासन दिले आहेत? याबाबत उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी साधलेला Exclusive संवाद...