यंदा जागतिक पातळीवर कापसाची मागणी वाढल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल आहे. कापूस विक्रीच्या हंगामाला जळगाव जिल्ह्यातील धरणगावातून सुरूवात झाली. दोन वर्षांचे लॉकडाऊन, त्याआधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे संकटात आलेला शेतकरी यामुळे खूश आहे. आता निसर्गाने एकदा चांगला पाऊस पाडला तर शेतकऱ्यांनाही चांगला पैसा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. कापसाचे अर्थकारण काय आहे, शेतात सध्या नेमकी परिस्थिती काय आहे आणि शेतकरी खूश का आहे, हे जाणून घेतले आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी...