डॉ. दाभोळकरांचा वैज्ञानिक विचार कुणाला खटकतोय?

Update: 2020-08-20 09:48 GMT

डॉ. नरेंद्र दाभोळकर (narendra dabholkar) यांचा आज 7 वा स्मृतिदिन त्यानिमित्ताने लेखक राम पुनियानी (ram puniyani) यांनी समाजात पसरलेली अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक विचाराला कशापद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जातो, यावर आपले विचार मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केले.

राम पुनियानी सांगतात की, डॉ. दाभोळकर यांनी अंधश्रद्धेला खत पाणी न घालता त्याविरोधात समाजात जनजागृती करुन महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा आणण्यासाठी जीवाची परवा केली नाही, सतत प्रयत्न केले. अशा या दाभोळकरांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आणि महाराष्ट्रात जादूटोणा कायदा २६ ऑगस्ट २०१३ ला अंमलात आणला.

हे ही वाचा...

sushant singh rajput case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

“ते” कुठे बॉलिवूडमध्ये होते!

दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर

मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात 10 टक्क्यांनी कमी

जादूटोणा कायद्याला अनेकांनी विरोध केला परंतु दाभोळकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारांपुढे सरकारला हा कायदा बनवावा लागला. मात्र आजही डॉ. दाभोळकरांचा वैज्ञानिक विचार कुणाला खटतोय? विज्ञानामुळे हे जग प्रगतीच्या मार्गावर गेलं आहे. तरीही हा वैज्ञानिक मार्ग काहींना नकोसा वाटतोय. खरंतर समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेविषयी जनजागृती आणि दाभोळकरांच्या वैज्ञानिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं लेखक राम पुनियानी म्हणतात. पाहा हा व्हिडिओ

Full View

Similar News