महापरिनिर्वाण दिन हा केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक होण्याचा दिवस नसतो. हा दिवस बाबासाहेबांचे विचार आणि उपदेश सोबत नेण्याचा दिवस असतो. त्यामुळे आता आपण कुठे आहोत आणि पुढे किती जायचे याचा विचार करणे ही काळाची गरज असते. एवढंच नाही तर महिलांच्या आयुष्यात बाबासाहेब आंबेडकरांचे किती योगदान आहे? याविषयी प्रा. आशालता कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.