खासदार कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला

खासदार अमोल कोल्हेंना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आव्हान दिले होते. अखेर ते आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे यांनी शब्द पाळला.;

Update: 2022-02-16 15:42 GMT

 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन राज्यात आता बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. आता बैलगाडा शर्यतीवरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते.शर्यतीमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या,असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना आव्हान केले होते. तसेच ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरु होईल.त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार हा शब्द देतो, असे अमोल कोल्हे यांनी त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारसभेत सांगितले होते.आज अखेर अमोल कोल्हे यांनी त्यांचा दिलेला शब्द पाळला आहे.

पुण्यातील निमगाव दावडी येथाल घाटातील बैलगाडा शर्यतीला अतिशय उत्साही वातावरणात सुरवात झाली.गावातील असंख्य नागरिकांनी शर्यत बघण्यासाठी गर्दी केली होती.या शर्यतीत खासदार अमोल कोल्हे यांनी शर्यतीत बैलगाड्यासमोर घोडी धरुन आपला दिलेला शब्द पाळला आहे.घोडीवर बसुन आनंद घेतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

लोकसभच्या निवडणुक प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यत सुरु होताच,पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या आश्वासनाची आठवन करुन देत आढळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्य़तीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरावावा,असे त्यांनी म्हटलं.दरम्यान आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातुन आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले होते. त्यामुळे अमोल कोल्हेंनी आपला शब्द पाळला असल्याचे मत नागरीक व्यक्त करीत आहेत.

Full View

Tags:    

Similar News