#मराठीभाषादिन : मराठी भाषेला प्राधान्य न देणाऱ्यांना मतदान करु नका – डॉ. श्रीपाद जोशी
मराठी भाषा जर पुढे न्यायची असेल तर मराठी भाषेची लोक चळवळ झाली पाहिजे, जो राजकीय पक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार मराठी भाषेला आपल्या जाहीरनाम्यात प्राधान्य देणार नाही, त्याला मतदानच कारायचे नाही अशी भूमिका घेतली पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष, लेखक आणि विचारवंत डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले आहे. मातृभाषेत शिकल्याने मुलांची आकलन आणि सर्जनशीलता वाढते, त्यातून मोठे मोठे साहित्यिक, कलावंत आणि वैज्ञानिक जन्माला येतात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांची भूमिका समजून घेतली आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...